शरद पवारांचा उतारा : अजित पवार, जयंत पाटील नाही; गृहमंत्रिपदासाठी ‘या’ तिसऱ्याच नेत्याला पसंती?

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर सापडलेली स्फोटके भरलेली कार आणि नंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक यात राष्ट्रवादीकडे (NCP) असलेले गृहमंत्रालयही बदनाम झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. देशमुखांचे उत्तराधिकारी म्हणून माध्यमांमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा असली तरी नवे गृहमंत्री म्हणून शरद पवारांच्या नजरेत तिसऱ्याच नेत्याचे नाव आहे, अशी चर्चा आहे.

अंबानी आणि वाझे प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची मोठी कोंडी झाली आहे. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठते आहे. शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. अनिल देशमुख यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे.

अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी अजित पवार किंवा जयंत पाटील यापैकी एकाला संधी मिळेल अशी चर्चा आहे. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा विचार कोरोना काळात प्रभावीपणे आरोग्य खाते सांभाळणाऱ्या राजेश टोपेंकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, आज अनिल देशमुख यांच्यासोबत राजेश टोपे हे पण पवारांच्या भेटीसाठी तातडीने दिल्लीला गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER