शरद पवारांकडून माजी मंत्री विनायक पाटील यांना श्रद्धांजली, कुटुंबियांचं सांत्वन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऊसतोडणीच्या दरावर काल तोडगा काढला. त्यानंतर आज ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील (Vinayak Patil) यांच्या निधनानंतर आज त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, फिरोज मसानी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

.