शरद पवार-प्रशांत किशोर भेट ; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

Sharad Pawar - Prashant Kishor - Maharashtra Today

मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहे . पवार यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजती ही भेट होणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांचा ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा होता .

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे. तसेच २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात भेटीत यूपीएचे नेतृत्व कुणी करावे या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे या मागणीने जोर धरला होता . शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आल्यापासून शरद पवारांनीच यूपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी या दोन्ही पक्षांकडून सातत्याने होत आहे .

पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून भाजपनं स्वत:ची सर्व ताकद पणाला लावली होती. केंद्रीय मंत्री, खासदार मंडळींपासून ते संघायचे स्वयंसेवक ममतांच्याविरोधात उभे ठाकले होते. तरीही ते ममतांचा पराभव करु शकले नाहीत. याचाच अर्थ असा की, मोदी-शाह म्हणजे सत्ता मिळणारच हे गणित आता राहीलेलं नाही. त्यातच प्रशांत किशोर यांनी ज्या विश्वासानं निकाला आधीच निकाल सांगितलेला होता ते पहाता, त्यांना भाजपची सध्याची स्थिती काय यावरही दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे . महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते.

देशात आगामी विधानसभा निवडणुका आता उत्तर प्रदेशच्याच आहेत. ज्याची उत्तर प्रदेशात सत्ता त्याचाच पंतप्रधान हे आतापर्यंतचं देशातलं राजकीय गणित राहीलेलं आहे. त्यामुळेच भाजपानं उत्तर प्रदेश राखण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्ली ते लखनौ अशा रोज बैठका पार पडत आहेत. त्यात संघाचं पाठबळही मोठं आहे. याच उत्तर प्रदेशच्या राजकीय स्थितीवरही या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button