‘शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक, मात्र शत्रू नाहीत’, पडळकरांचे विधान चुकीचे- फडणवीस

Sharad Pawar & Devendra Fadnavis

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे विधान भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. या विधानामुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली.

पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत.’ असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, पडळकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये, अशी मागणी केली आहे.

त्यांच्या या मागणीनंतर फडणवीस यांना याबाबत विचारलं असता, “मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पूजेसाठी यायचं असेल तर त्यांना येऊ दिलं पाहिजे. विठ्ठल आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण अध्यात्माचा राजा म्हणतो. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मुख्यमंत्र्यांचा मान नाही, तर हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, आमच्या राजाची त्यांनी पूजा केली पाहिजे. ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER