शरद पवार जवानांच्या बाजूने : नवाब मलिक

Sharad Pawar-Nawab Malik

मुंबई :- दिल्लीमध्ये (Delhi) प्रजासत्ताकदिनी (Republic Day) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलीस दलात पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार (Ashish Shelar) यांना माहीत नाही काय? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केला आहे. दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही स्पष्ट केलं  होतं. हा मोर्चा दिल्लीत आला. त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला ही बातमी चुकीची आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

लाल किल्ल्याच्या दिशेने शेतकऱ्यांची रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता. तिथे ध्वज फडकवण्याचं काम भाजपशी संबंधित दीपसिंह सिद्धूनं केलं. याच दीपसिंह सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती, असं सांगतानाच दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोपही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : संयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER