एक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद पवार

Sharad Pawar-Ramdas Athawale

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत (BJP-RPI) यावं. रिपाइं आधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो. पवारांना भविष्यात सत्तेत संधी मिळू शकते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा अनुभवी नेते एनडीएमध्ये आले तर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी पवारांना दिला होता. त्यावर खुद्द पवारांनी सणसणीत उत्तर दिले.

शरद पवारांनी आठवलेंच्या प्रस्तावावर बोलताना सांगितलं की, रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यापेक्षा यूपीसाठी करा- संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER