मोदी सरकारला पर्याय देणं राष्ट्रीय गरज; मी पुढाकार घ्यायला तयार – शरद पवार

शरद पवारांची पुढची राजकीय वाट'चाल' पंतप्रधानपदाकडे!

Sharad Pawar on PM Modi Govt

मुंबई :- ‘देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील सध्याच्या सरकारला पर्याय देणं ही राष्ट्रीय गरज आहे. त्या एकजुटीसाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे. असं ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, त्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही असेही शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रीय राजकारणात सध्या भाजपचं वर्चस्व असून विरोधी पक्ष विखुरलेला दिसत आहे. हा विरोधी पक्ष भविष्यात मोदी सरकारला आव्हान देऊ शकतो का, असा प्रश्न संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारला.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांनी संवाद ठेवला तर कोणतेही ऑपरेशन फोल ठरेल – शरद पवार 

त्यावर पवार म्हणाले, विरोधी पक्षामध्ये ती ताकद निश्चित आहे ‘खरंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात चर्चा होऊन काही धोरणं ठरवण्यात आली. मात्र, नंतर करोनाच्या संकटामुळं पुढचं काम थांबलं,’ असं त्यांनी सांगितलं. ‘करोनाचं संकट दूर झालं आणि संसदेचं कामकाज सुरू झालं की पुन्हा एकत्र येण्याची भावना विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे. आपण एकत्र आलं पाहिजे. एक सक्षम पर्याय दिला पाहिजे, असं सर्वांचंच मत आहे. हे सगळे पक्ष एकत्र येतील,’ असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

तसेच, ‘विरोधी पक्षाचं ऐक्य होणार असेल तर मी त्यात अधिक लक्ष घालेन. त्यासाठी कोणालाही भेटायचं असेल तरी भेटेन. मला त्यात अजिबात कमीपणा वाटत नाही,’ असेही पवारांनी सांगितले.

शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER