पंढरपूर पोटनिवडणूक : पवारांच्या शब्दानुसार यांना मिळणार राष्ट्रवादीचे तिकीट

Sharad Pawar

मंगळवेढा :- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील (Pandharpur Assembly constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. मात्र राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भालके कुटुंबातीलच व्यक्तीला तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांपूर्वी या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू होती. मात्र आता या सर्व चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

या मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार हा भालके कुटुंबातीलच राहणार आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर लवकरच होणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रभारी लतीफ तांबोळी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक नावे पुढे येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून होत असलेल्या गोंधळाबद्दल तांबोळी यांनी सांगितले की, पक्षीय संघटनेत बदल करताना काही नव्या चेहऱ्याला संधी देत असताना जुन्यांना थांबावं लागतं. काहींना संधी मिळत नसते. त्या गोष्टीचा विरोधकांनी अपप्रचार अथवा राजकारण करण्यासारखं काहीच नाही. त्यामध्ये पक्षीय संघटनेत बदल हा ठरलेला असतो.

पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत मतदारसंघातून भगिरथ भालके यांच्या नावाला सर्वांची पसंती आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये देखील त्याच नावाला हिरवा कंदील दिल्याचा संदेश वरिष्ठ पातळीवर आहे, त्यामुळे दुसऱ्या नावांची चर्चा करणे व्यर्थ आहे. तसेच, पंढरपूर मतदारसंघातून पार्थ पवार हे पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा ही निरर्थक आहे. कारण, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या नावाची चर्चा यापूर्वीच संपुष्टात आली आहे, असे तांबोळी यांनी नमूद केले.

पंढरपूर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचा बालेकिल्ला असल्यामुळे पक्षाच्या विचाराचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी होणार आहे. लवकरच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात चर्चा होऊन उमेदवार जाहीर होणारकरण्यात येईल अशी माहितीही तांबोळी यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसला धास्ती पवारांची, पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या प्रचाराला न येण्यासाठी विनंती पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER