शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; निवडणूक आयोगाला लगावला टोला

देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे : शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात पवारांकडून निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे, टोला पवारांनी निवडणूक आयोगाला लगावला आहे .

ही बातमी पण वाचा:- मराठा आरक्षणप्रश्नी  राज्य सरकारची भूमिका स्पष्ट : शरद पवार 

२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन, असेही शरद पवार म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER