‘कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटले हं !’ शरद पवारांच्या वक्तव्याने हशा पिकाला

Sharad Pawar & Kalyanrao Kale

मुंबई :- भाजप नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale)  राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करून निर्णय घेऊ, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही कल्याणरावांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.

सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) एकाच मंचावर उपस्थित होते. सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊ. कल्याणराव, सगळ्यांना म्हटले हं… सगळ्यांना बरोबरीत घेऊन निर्णय घेऊ. सगळे येतात, एकत्र चर्चा करतात, त्याचे काय वेगळे  होणार आहे का?

असे पवार मिस्कीलपणे म्हणाले. दरम्यान वयाच्या ऐंशीव्या वर्षातही तरुणांना लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतंच राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाचा  दाखला दिला होता. तुम्ही आता मला वडिलधारे म्हणू शकता, असे पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांची आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था चर्चेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER