धनंजय मुंडेंसाठी देवेंद्र फडणवीसांची ढाल; शरद पवारांकडून दाखला देत भाजपची कोंडी

Dhanajay Munde-Sharad Pawar-Devendra fadnavis

मुंबई :- धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावरील बलात्कारासारख्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भूमिकेत बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, रेणू शर्मा यांच्या विरोधातील काही बाजू भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी समोर आणली आहे. त्यानंतर पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आता नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शरद पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते .

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे हे स्वत: राजीनामा देतील किंवा खुद्द शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असं चंद्रकांत पाटील गुरुवारी म्हणाले. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhakhalkar) आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच तक्रार करत मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे भाजपचेच नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजीनाम्याची मागणी न करता, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. फडणवीसांच्या याच भूमिकेचा आधार घेत शरद पवार यांनी भाजप नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या एका नेत्यानं काळजीपूर्वक चौकशी करावी असं सांगितलं आहे. लगेच राजीनामा घेऊ नये असं त्यांनी म्हटलं. ते राज्याचे प्रमुख होते. संयमाने हे प्रकरण हाताळावं असे त्यांनी म्हटले होते, अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या विधानाचा दाखला दिला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘सत्य बाहेर आल्याशिवाय राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER