शरद पवार पुन्हा सक्रिय; काही घटकांना मदत करण्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सूचना

AJit Pawar - Uddhav Thackeray - Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काही दिवसांपूर्वीच दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आले आहेत. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्यानं पुनश्च संचारबंदीचा निर्णय़ राज्य सरकारला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून, हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले’, अशी माहिती पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मा. मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या निवासस्थावरून पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला
MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button