पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द, कार्यकर्त्यांचा हिरमोड

Sharad Pawar

मुंबई :- जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा पहिलाच दौरा खान्देशमध्ये नियोजित करण्यात आला होता. मात्र एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून पवारांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली जात होती. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना कोरोना (Corona) ची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला होणारा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

शरद पवार येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार होते. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार होते. या दौऱ्यातून शरद पवार हे भाजपच्या गडात शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत होते. पण, सोमवारी रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्याची आला. शरद पवारांचा हा दौरा येत्या काळात पुन्हा आयोजित केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र याची तारीख किंवा ठिकाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही बातमी पण वाचा : पवारांचा फोन, शब्दाचा मान राखत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER