
रायगड : राज्यात कोरोना (Corona) विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, तरीदेखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. कोरोना विषाणू घातक आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ते रायगडमधील रोहा येथे बोलत होते
मी आता येताना आदिती आणि तटकरे साहेबांना दाखवतो होतो, रस्त्याने दहा माणसं दिसली त्यापैकी सलात माणसांच्या तोंडावर मास नव्हतं. सगळे लोकं मला हात दाखवत होते. नमस्कार करत होते. मी म्हटलं मास्कचं काय? तर त्यावर कुणी बोलत नव्हतं. लोकांनी मास्क वापरणं सोडून दिले. मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याबद्दल जे जाणकर लोकं आहेत त्यांच्याशी माझा संपर्क असतो. देशाच्या आरोग्य खात्याशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी मी गेल्या दोन दिवसांपासून बोलतोय. तर त्यांनी मला सांगितलं, शासन कदाचित या निष्कर्षावर येईल, हा विषाणू थोडा वेगळा आहे. जादा घातक आहे. त्यामुळे काळजी घेतली नाही. तर आपल्याला परिणाम भोगावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने खबर घेतली पाहिजे. पण आपण सगळे राजे आहोत. लोक म्हणतात आम्ही पळवला कोरोना विषाणूला, असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला