शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तत्काळ घरी पाठवावे; किरीट सोमय्या यांची मागणी

Kirit Somiya & Sharad Pawar

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं, अशी मागणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे.

सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी विचारपूस केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांची हकालपट्टी करण्यासाठी थेट शरद पवार यांनाच आवाहन केले. २००४ मध्ये वाझेंची हकालपट्टी करण्यात आली होती. २००७ मध्ये ते सेवेतून मुक्त झाले. या दोन्ही वेळा राष्ट्रवादीचाच गृहमंत्री होता.

असं असतानाही वाझेंना आता सेवेत घेण्यात आले आणि चांगली पोस्टिंग दिली. तसेच मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे देशमुख यांची पवारांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. पवारांनी एक तर देशमुख यांची हकालपट्टी करावी किंवा त्यांनीच या प्रकरणावर भाष्य करावे, असेही सोमय्या म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER