शरद पवार मिशन गोव्यावर, २०२२ मध्ये भाजपची सत्ता उलथवण्यासाठी घेतला पुढाकार

Sharad Pawar - BJP

पणजी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी सांगितले की, त्यांचा पक्ष कॉंग्रेस (Congress) आणि अन्य समविचारी पक्षांच्या सहकार्याने २०२२ च्या गोवा विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा विचार करीत आहे.

पणजी येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, भाजपला (BJP) पर्याय उपलब्ध करुन द्यावा यासाठी गोवा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादीला अन्य पक्षांसमवेत “आघाडी” म्हणून लढवायची आहेत. गोव्यात आम्हाला कॉंग्रेस व इतर समविचारी पक्षांच्या युतीने निवडणूक लढवायची आहे, परंतु अन्य राजकीय संघटनांशी संवाद सुरू होणे बाकी आहे, असे राष्ट्रवादीचे पवार म्हणाले.

विधानसभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जोसे फिलिप डिसूझा आणि चर्चिल अलेमाओ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विधानसभेच्या निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी अन्य पक्षांशी संवाद साधण्याचे अधिकृत केले आहे. युती आणि भागीदारांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा राष्ट्रीय स्तरावर होईल. निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी याबाबत चर्चेला सुरूवात होईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER