पुढचे मुख्यमंत्री शरद पवार तर, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे?, अजित पवारांचे संकेत

Sharad pawar-Aditya Thackrey

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना भाजपची भांडणं आता महाराष्ट्राला रोजची झालीयेत. कोण होणार मुख्यमंत्री ? या प्रश्नाचा आता पीट्टा पडलाय. एकीकडे राज्यात शिवसेना-भाजप युतीत सत्तास्थापनेवरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना विरोधी पक्षांची मात्र बैठकांची लगबग सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नाशिक दौऱ्यानंतर शनिवारी मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठीकीनंतर आता एक वेगळीच, मोठी बातमी पुढे येत आहे. ही बातमी महाराष्ट्रातील राजकारण बदलून टाकणारी अशीच आहे.

भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास अपयश आलं तर, आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कॉंग्रेससोबत शिवसेना राष्ट्रवादीला पाठींबा देण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. असं झाल्यास शरद पवार मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. या बैठकीनंतर अजित पवारांनी तसे संकेतही दिलेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार?

शरद पवार यांच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले की, यापूर्वीही महाराष्ट्रात असं घडलेलं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे की अजित पवार यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे?

दरम्यान, शरद पवार हे आज दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुढची दिशा स्पष्ट होणार असल्याचं चित्र आहे.