आता पवारांची गोव्यात मोठी खेळी? भाजपविरोधी नेत्यांशी केली दीर्घ चर्चा

Sharad Pawar

गोवा :  महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) एकत्र आणून महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता गोव्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही पवारांनी भाजप (BJP) विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा गोव्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शरद पवार हे सध्या कुटुंबासह खाजगी दौऱ्यावर गोव्यात आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. या दरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन रात्री उशिरा दीर्घ चर्चा केली. या भेटीचे फोटो खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. या चर्चेचा कोणता तपशील बाहेर आला नसला तरी शरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोट  बांधू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER