दिल्लीत शरद पवारांनी गडकरी, शाह, सोनिया गांधींची भेट घेतली ; वंचितचा आरोप

Prakash-Ambedkar-Sharad-Pawar

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे . पवारांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दिल्लीत बैठक केली असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने केला आहे . तसेच शरद पवार यांनी याबाबत खुलासा करावा असंही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे . यासोबतच पक्षांतराचे वारेही वाहू लागले . काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला . अद्यापही दोन्ही पक्षाची गळती सुरु आहे.

‘वंचित बहुजन आघाडी म्हणून नवीन एक पार्टी आली आहे . वंचित ज्या पद्धतीने जात आहे त्यांची नियत साफ नाही असं चित्र दिसत आहे. कारण वंचितकडून सेक्युलर असे सांगत असले तरी, अप्रत्यक्षरीत्या ते भाजपचाचं फायदा करून देत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता . त्यावर आंबेडकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

दरम्यान आगामी काळात शरद पवारांकडून काय प्रतिउत्तर मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : कोणाशीही युती न करता वंचित आघाडी सर्वच्या सर्व जागा लढवणार – प्रकाश आंबेडकर