बैठक! शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, अजित पवारही हजर

CM Uddhav thackeray-Sharad Pawar

मुंबई : राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आज शनिवारी सायंकाळी मुंबईत झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी पंतप्रधानांसोबत सीएए आणि एनआरसीवर चर्चा केली होती. या पृष्ठभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीतही सीएए आणि एनआरसीबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकदा उभे करून द्यायचे, चालायला लागले की दूर व्हायचे, यापेक्षा जास्त सरकारशी संबंध नाही : पवार

दरम्यान, येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन प्रारंभ होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प या अधिवेशनात ठेवण्यात येणार असल्याने आजच्या बैठकीत त्यावरही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.