पवार-राऊत भेटीनंतर शिवसेनाही कृषिकायद्याविरोधात मैदानात, आघाडीची रणनीती ठरली

Sanjay Raut-Sharad Pawar

मुंबई :अँजिओप्लास्टी झाल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना शनिवार (5 डिसेंबर) रोजी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांची आजच्या सामानातून भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही नेत्यांसोबत जाऊन राऊतांची भेट घेतली.

या भेटीत पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला पुढची रणनीती काय असेल याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच कृषिकायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन संजय राऊतांच्या घरी जाण्यासाठी रवाना झाले. शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार शतायुषी राहणार – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER