शरद पवारांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.

दरम्यान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar)सास्तूरकडे निघाले होते. त्यावेळी लोहारा इथल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. गाडीच्या खाली उतरुन पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी सरकारनं आपल्याला तातडीनं मदत करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी पवारांकडे केली. पवारांच्या या दौऱ्याकडे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आशेनं पाहत आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार थेट नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर, शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER