‘तुम्हाला कुठे ‘झक’ मारायचीय ती मारा’, शरद पवारांच्या शब्दांचा बांध फुटला!

NCP-Sharad Pawar

उस्मानाबाद : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागलेली आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी चांगलेच बरसले. त्यांच्यावर टीका करत असताना पवारांच्या शब्दांचा बांध फुटला. तुम्हाला कुठे जायचेय तिथे जावा आणि झक मारा, अशी टीका पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली.

ही बातमी पण वाचा:- कोणाच्या पाया पडण्यापर्यंत आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका – शरद पवार

शरद पवारांनी आज उस्मानाबाद येते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी पवार म्हणाले, मी एका नेत्याला भेटलो असता त्यांनी कारखान्याच्या चौकशीच्या नोटीस आल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे साहेब मला जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, असे तो नेता मला म्हणाला. मी त्याला तुम्ही कुठेही जावा, कुठेही झक मारा, असे बोललो.

पवारांनी ‘झक मारा’ हे वाक्य वापरताना कोणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे हा शब्द डॉ. पद्मसिंह पाटील, उदयनराजे किंवा राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांपैकी कोणासाठी वापराला हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ही बातमी पण वाचा : पवार देत आहेत तरुणांना संधी; पण घराणेशाही अबाधित