शरद पवार कांजूरमार्ग मेट्रो कारशेड वादाबाबत पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता – नवाब मलिक

मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधक आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. हा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी पवार (Sharad Pawar) पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना भेटण्याची शक्यता आहे, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Mawab Malik) यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. (Sharad Pawar will meet to Narendra Modi for solving kanjurmarg metro carshed dispute)

उद्धव ठाकरे-शरद पवार चर्चा

कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, स्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिल्यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलाच वाद सुरू झाला आहे. न्यायालयाने काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. ठाकरे सरकारसाठी हा मुद्दा आता प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. कांजूरमार्ग कारशेडवर चर्चा झाल्याचे कळते. याविषयी माहिती देताना नवाब  मलिक म्हणालेत, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. कुठलाही मार्ग निघाला तर बघायला हवे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

पवार मोदींना  भेटणार

शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील, अशी माहिती मलिक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER