लवकरच शरद पवार अमित शहांची भेट घेणार?

Amit Shah - Sharad Pawar

नवी दिल्ली :- केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपनं सध्या संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलं आहे. लक्षद्वीपमध्ये प्रशासकाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. सध्या लक्षद्वीपमध्ये प्रफुल्ल खोडा पटेल हे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रफुल्ल  खोडा पटेल हे गुजरातमध्ये तत्कालीन मोदी सरकारमध्ये गृहमंत्री होते. डिसेंबर २०२० मध्ये ते लक्षद्वीपमध्ये प्रशासक म्हणून आले. त्यांनी या केंद्रशासित प्रदेशात नवा कायदा आणल्यामुळे हा वाद उफाळला आहे. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीपमधील एकमेव खासदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल यांनी पवार-शहांच्या भेटीची माहिती दिली. या भेटीत शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांना प्रशासक पदावरून हटवण्याची मागणी करू शकतात, अशी माहिती फैजल यांनी दिली. केंद्र सरकारने लक्षद्वीपमध्ये विकासाच्या नावाखाली हा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्थानिकांचा त्याला विरोध आहे. प्रफुल्ल  पटेल यांच्या वादग्रस्त निर्णयावर स्थानिकांची नाराजी आहे. त्यामुळे शरद पवार त्यांना हटवण्याची मागणी करू शकतात, असे फैजल यांनी सांगितले.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी लक्षद्वीपमध्ये प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून काही निर्णय घेतले आहेत. त्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. पटेल यांनी आणलेल्या नियमांमध्ये, गोहत्या आणि बीफवर बंदी, निवडणूक लढण्यासाठी दोन अपत्यांची अट, दारूबंदी हटवली, प्रशासनाला जमीन अधिग्रहणाचे अधिकार, कुख्यात गुंडांना वर्षभर जेलमध्ये डांबणे, त्यांना कायदेशीर मदत न देणे, कोरोना नियमांमध्ये बदल, अशा  काही नियम-अटींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button