मुख्यमंत्र्यांना सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे आहे ? पवारांचे राज्यपालांना खरमरीत पत्र

Sharad Pawar-Bhagat Singh Koshyari.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना उपरोधिक टोला लगावत खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना ‘कॉफी टेबल’ पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.

भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्रे आहेत.

तसेच निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, असा टोला शरद पवारांनी या पत्रात लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER