शरद पवार संजय राठोडांच्या शक्ती प्रदर्शनाच्या गोंधळावर नाराज

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Sucide Case) प्रकरणातील संशयित वनमंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थनात आज वाशिममधील पोहरादेवी गडावर गर्दी उसळली होती. राठोड यांनी यातून शक्ती प्रदर्शन केले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संजय राठोड हे पूजाच्या मृत्यूनंतर बेपत्ता होते. ते १५ दिवसांनंतर आज पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. पोहरादेवी गडावर त्यांचा समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री सतत करत आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली व याबाबत उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली. आपण जनतेसाठी नियम लावत असू, तर अशापद्धतीने नेत्याने समर्थकांची गर्दी करु नये, असे शरद पवारांनी ठाकरेंना सांगितल्याचे कळते.

कारवाई करा – उद्धव ठाकरे

पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबतच्या बातम्या माध्यमात आल्या. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी व वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER