शरद पवार म्हणजे ‘ठग्स ऑफ ठेवीदार’ – आशिष शेलार

मुंबई : शरद पवार ठग्स ऑफ ठेवीदार आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पवारांवर टीका करताना ते म्हणाले की, पवार व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत.

या घोटाळ्यात शरद पवारांचे नाव आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर सूडबुद्धीने राजकारण केल्याचा आरोप केला होता.

त्या आरोपांचा समाचार घेताना शेलार म्हणाले की, गुन्हा ईडीने दाखल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले; त्यात शरद पवारांचे नाव आहे. न्यायालयाने चारदा शरद पवारांचे नाव घेतले आहे. आम्हाला काय विचारता? पवारांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. पवार परिवार ठग काका – पुतण्यांचा आहे.