शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे नेते, त्यांना रोज भेटण्यात रहस्य काय? – संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला ज्या प्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आलं आहे. यावरुन असं वाटतं हे कोणी बाहेरुन आलेले शेतकरी आहेत देशातील नाहीत. देशातील फक्त पंजाब आणि हरियाणा नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सहानुभूतिपूर्वक विचार करावा. आज देशातील राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांना टीका केली तर वाईट वाटते. पंजाबमधून आलेला शेतकरी अन्नदाता आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखले गेले आहे. असे वाटते कि ते या देशाचे नाहीत. त्यांना दहशतवाद्यांसारखे वागवले गेले आहे ते शीख असल्यामुळे आणि पंजाब आणि हरियाणाहून आले आहेत, त्यांना खलिस्तानी म्हणतात. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. पंजाबमध्ये ठिणगी टाकायची आहे का?, अस्थिरता, अशांतता निर्माण करायची आहे का? हे पाहावे लागेल, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) स्थापनेविषयी भाष्य केले. सरकारस्थापनेविषयीच्या अनेक गोष्टी पडद्यमागे आहेत आणि त्या बाहेरही पडणार नाहीत. शरद पवार (Sharad Pawar) यांना लपून छपून भेटत नाही. त्यांना खुलेआम रोज भेटतो. ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत त्यांना रोज भेटतो यात रहस्य काय?,असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER