शरद पवार सर्वांचे गॉडफादर, निर्णयाचा दोष त्यांच्यावरच : चंद्रकांत पाटील

Sharad Pawar-Chandrakant Patil

मुंबई : “शरद पवार (Sharad Pawar) हे सर्वांचे गॉडफादर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सगळे त्यांचे ऐकतात. कोणत्याही निर्णयाचा दोष त्यांच्यावरच जाणार.” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. तसेच ओबीसी आरक्षणावरून भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी शरद पवार आरक्षण प्रश्नाला जबाबदार असल्याचे म्हटले होते.

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित केला. यावेळी पाटिल म्हणाले की, “जून ला कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मुंडेंचे निधन झाले. आज ७ वर्ष झाली. दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक एन्व्हलप करत आहे. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली.”

“भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरू असतात. पवार आजारी आहेत. त्यांची चौकशी करायला रक्षा खडसेंची भेट घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणे ही संस्कृती आहे. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. वाद होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जर संवाद नसेल तर अडचण निर्माण होतात. पण इथे ते आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.” असेही पाटील म्हणाले.

ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत पाटील म्हणाले की, “पडळकरांनी काही भुमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॉडफादर आहेत. असे म्हणल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. याविषयी खुली डिबेट करायची माझी तयारी आहे. मी निकाल वाचल्यानंतर त्यात जाणवते की पावला-पावलावर चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button