‘आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष’

Sharad Pawar - Sadabhau Khot

धुळे : तुम्ही ज्या नर्सरीत शिक्षण घेता, शरद पवार (Sharad Pawar) हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी कधीचेच सिद्ध करुन दाखवले असल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे (NCP) युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना लगावला. सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे, त्यांनी कोणाच्या बाबतीत असं बोलावं हे त्यांना कळत नाही, अशा शब्दात शेख यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला.

सदाभाऊ खोत हे कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत बोलतात, याचं भान त्यांनी ठेवायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर नक्कीच खेळले आहेत. पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणे यांना अपेक्षित आहे का आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब आहेत, हे सिद्ध करुन दाखवल सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, ते काहीही बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER