शरद पवार गृहमंत्रीच नव्हे तर पोलीस विभागातही मोठ्या फेरबदलाच्या तयारीत

Sharad Pawar

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या गंभीर आरोपांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने शरद पवारांनी ही बाब चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. सरकारची नाचक्की झाल्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवार गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांचा राजीनामा तर घेतीलच शिवाय पोलीस विभागातही मोठे फेरबदल करतील अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. त्यातच परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे.

दरम्यान, परमबीर यांचा अधिकृत ईमेल आयडी आणि प्राप्त झालेल्या मेलच्या ईमेल आयडीत तफावत असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. हे ईमेल आयडी तपासून घेण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. खरचं गृहमंञ्यांनी असे आदेश संबधित अधिकाऱ्यांना बोलावून दिले होते का ? हे तपासण्यात येणार असून त्यानुसार त्या दोन बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही अधिकारी परमबीर यांच्या जवळचे असल्याच्या गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. संबधित आरोपांबात नवे पोलिस आयुक्त अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER