शरद पवार आमचं सर्वांचं दैवत, आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही – अजित पवार

Ajit pawar-Sharad pawar

पुणे : भाजपाकडून (BJP) वारंवार राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi) त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपाच्या या दाव्यावर महाविकास आघाडीकडूनही राज्यात स्थापन झालेल्या सरकारला कुठलाही धोका नाही. १९९५ ते ९९च्या काळात आम्ही ८० जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आमदार आणि कार्यकत्यांमध्ये चलबिचल होते, म्हणून कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं. त्यामुळे विरोधक सरकार पडणार असं बोलत असल्याचा टोला अजित पवार यांनी भाजपाला लगावला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कराडला गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

आता जाणार, पुढे जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असंही अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

त्यासंदर्भात शरद पवारांनी काल जयसिंगराव गायकवाडांच्या पक्ष प्रवेशात सरकार पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावर मी जास्त बोलणं योग्य दिसत नाही. शरद पवार आमचं सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केलेलं आहे, असंसुद्धा अजित पवार म्हणाले आहेत. ते १०५ लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, ईडीचा (ED) वापर कसा करून घ्यायचा हा केंद्राचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. राज्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाल्यास राज्याचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत आपल्या पोलिसांनी खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे. अनेक सरकारच्या काळात पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे. पोलिसांनी आता असं का केलं, याची माहिती नाही. माझं प्रताप सरनाईकांशी बोलणं झालेलं नाही. कॅबिनेटमध्ये असताना आम्हाला ही बातमी समजली. त्यानंतर मी कराडला निघून आलो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER