शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस

Sharad Pawar-Devendra Fadnavis

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar)यांनी कुठेही कृषी विधेयकाला विरोध केलेला नाही तर त्यांनी रविवारी राज्यसभेत जो प्रकार घडला त्याबद्दल उपोषणाला बसलेल्या खासदारांच्या कृतीचे समर्थन केले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे . देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कृषी विधेयकावरून काँग्रेसवर निशाणा साधत पवारांना टोला लगावला.

राज्यसभेतल्या प्रकारानंतर व्यतित होत पवारांनी एक दिवसांचा अन्नत्याग केल्याचं मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावर “राज्यसभेत जर त्या खासदारांनी तसे वर्तन केले नसते तर शरद पवारांना आज एका दिवसांचा अन्नत्याग करावा लागला नसता”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

दरम्यान कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रासाठी सोमवारी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर निलंबित खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे .

हे बातमी पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER