शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत; भाजप नेत्याचा घणाघात

Sharad Pawar - Girish Bapat - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केलीय. त्यावरूनच आता भाजपचे (BJP) खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला.

एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणं हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे, कुंपणच शेत खायला निघालंय, अशी परिस्थिती आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सर्व क्लिप आल्यावर सगळं सत्य पुढे येईल. शरद पवार हे क्लीनचिट द्यायला न्यायाधीश नाहीत. ते कॉंग्रेसला लिंबू टिंबू समजतात, कॉंग्रेसला गृहीत धरले जात नाही, याची किंमत कॉंग्रेसला येत्या काळात चुकवावी लागेल. शरद पवार नेहमीच सरकार खंबीर असल्याचे सांगतात, मात्र ते या प्रकरणातून कळतंय किती खंबीर आहेत, असा टोलाही गिरीश बापट यांनी लगावला.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप चर्चेत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER