पवारांचे नेहमीच महाविकास आघाडीला मार्गदर्शन; मेट्रो कारशेड प्रकरणातही लक्ष घालतील

Eknath Shinde - Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नेहमीच महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे मेट्रो कारशेड प्रकरणातही ते लक्ष घालतील. ज्या ज्या वेळी असे प्रसंग येतात तेव्हा शरद पवार मार्गदर्शन करतात. पवारसाहेबांनी पुढाकार घेतला तर यातून मार्ग निघू शकतो, असे  शिवसेनेचे (Shiv Sena) नेते, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘कांजूरमार्गची जागा राज्य सरकारची आहे हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. लाखो लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडचा निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे. यामध्ये एक कोटीहून जास्त लोकांना फायदा झाला असता. केंद्र सरकारनेही सहकार्य करायला पाहिजे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अधिक  बोलता येणार नाही.’ असं शिंदे म्हणाले. तसंच, शिंदे म्हणाले, ‘कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद सुरू आहे. न्यायालयाने फक्त कामाला स्थगिती दिली आहे.

पण आणखी काही जागांचे पर्याय तपासले जात आहेत. जो पर्याय चांगला असेल तो निवडला जाईल. बीकेसीमधील जागेची पाहणी सुरू आहे.’ असं शिंदेंनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक पातळीवर पॅनल करून लढवल्या जातात. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीच आघाडीवर असेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मेट्रो कारशेडवर तोडगा काढण्यासाठी विरोधकांना चर्चेसाठी आवाहन केले आहे. तर शरद पवार हे मेट्रोचा अहवाल वाचतील आणि योग्य तो निर्णय घेतील, असा पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनीही मेट्रोच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. आता या वादावर कसा तोडगा निघतो हे पाहण्याचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER