कुटुंबातील वाद संपवण्यास शरद पवार सक्षम, पार्थबाबत मी काय बोलू? – संजय राऊत

Sanjay Raut-Sharad pawar-Parth Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातू पार्थ पवार यांना (Parth Pawar) प्रसारमाध्यमांसमोर ‘अपरिपक्व’ म्हटले होते. तसेच त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नसल्याचे म्हणाले होते. शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. आता यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार कुटुंबातील प्रश्न निकाली काढण्यास सक्षम आहेत.

यावरून इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचं काही कारण नाही. त्यांनी चिंता करू नये. हा त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत विषय आहे, त्यांनाच तो सोडवू द्या, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. संजय राऊत म्हणाले, दुसऱ्या पक्षातील प्रमुख नेत्यांना सल्ला देण्याचं माझं काम नाही. सामना एक वृत्तपत्र आहे. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचं काम मी करत असतो. काल एक प्रकार घडला.

तो मीडियाने घडवला, याच्या पलीकडे त्याला महत्त्व नाही- असे म्हणत त्यांनी बगल दिली. “खरं तर तो विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत विषय आहे. तो शरद पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी भाष्य करू नये. मला वाटतं पवार कुटुंब आणि त्यांचा पक्ष हे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी सक्षम आहेत.

त्या विषयावर त्या पक्षाचेच प्रवक्ते बोलतील. पवार कुटुंबातील कुणी तरी बोलतील, मी कशासाठी बोलावं?” असं संजय राऊत म्हणाले. पार्थ पवार नाराज आहेत की नाही हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. हे त्यांचे घरातील आईवडील ठरवतील. त्यांचे आजोबा ठरवतील. त्यांच्या पक्षाचे लोक ठरवतील.

पार्थ पवार यांनी अगदी सुरुवातीला काही मागणी केली असती तर ते समजू शकलो असतो. मात्र, दोन महिन्यांनी त्यांच्या पत्राचा ढोल वाजवून वापर केला जातोय हे चुकीचं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिल्याबद्दल त्याचं मला कौतुक असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच त्याच्याकडे सकारात्मक नजरेने बघावे, असंही म्हटलं.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER