शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?; उद्धव ठाकरेंचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल

Sharad Pawar - Uddhav Thackeray - Chandrakant Patil

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत…प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपाचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी केलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , होय, शरद पवार आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचासुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी एक विधान केलं होतं. त्या राजकीय विधानावरून बराच राजकीय वाद रंगला. पाटील यांनी पवारांविषयी केलेल्या विधानाबद्दल संजय राऊत यांनी अभिनंदन मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांचे मत जाणून घेण्यासाठी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER