शरद पवार हे लोकनेते, त्यांचा सल्ला घेतल्यास चंद्रकांतदादांना वाईट वाटू नये – संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar - Chandrakant Patil

मुंबई :- कोरोना (Corona) काळात जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यपालांनी या मुद्द्यावर शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करण्याचा सल्ला राज ठाकरे याना दिला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे नाही तर शरद पवार चालवत आहेत, असा आरोप केला होता. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार हे जेष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे सरकार चालवतात, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा सल्ला घेण्यात गैर काय? चंद्रकांतदादांनी (Chandrakant Patil) त्याचे वाईट वाटून घेऊ नये. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होते?, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. खरे पाहता राज्यपालांनी पवारांएवजी राष्ट्रपतींकडे जाण्याचा सल्ला द्यायला हवा. कारण राष्ट्रपतीही शरद पवारांना आपले नेते मानतात. राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, आम्ही दाखवून देऊ. शरद पवार हे प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे. शरद पवार हे लोकनेते आहेत. मागील कित्येक वर्षात लोकांमध्ये जाणारा नेता मी पाहिलेला नाही, असं कौतुक संजय राऊत यांनी केलं.

कंगनाला (Kangana Ranaut) जास्त महत्व देऊ नये, ती एक संशयित आरोपी आहे. ती पोलिसांसमोर हजर राहणे गरजेचे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा उल्लेख अशा प्रकारे करणे कितपत योग्य आहे. त्यांची लायकी नाही. आमचं राजकीय हिंदुत्व नाही. राजकारणासाठी आजवर कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपण हिंदुत्त्वाची भूमिका मांडतं. घंटा बडवल्या, शेंडी-जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मी अजूनही शिवसैनिक असून, शिवसैनिकाला (Shiv Sena) वय नसतं असंही यावेळी ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER