शरद पवारांनीच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असे म्हटले होते : मनसे नेत्याचा ट्विट करत निशाणा

Sharad Pawar-Anil Shidore

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकरी संघटनांकडून उद्या देशव्यापी बंदची हाकही देण्यात आली आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही पेटले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे शरद पवार यांनी यापूर्वी म्हटल्याचे, मसनेचे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांनी म्हटले.

शरद पवार यांनी कृषी विधेयकाला विरोध केल्यानंतर त्यांच्याच ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातील आठवण त्यांना करून देण्यात येत आहे. त्या  पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढलं पाहिजे, असे म्हटले असल्याचे समजले. मी पुस्तक वाचलेलं नाही पण हे खरं आहे का? असा सवाल अनिल शिदोरे यांनी विचारला आहे.

शिदोरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनाही यामध्ये टॅग केले आहे. त्यानंतर, एका युजर्सने शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातील त्या पानाचा फोटोच शेअर केला आहे. तसेच, होय, पवारांनी तसे म्हटले होते. शेतकऱ्यांना जगात कुठेही माल विकता आला पाहिजे, अशीच त्यांची भूमिका होती, असेही त्यात लिहिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER