शरद पवारांकडून पुणेकरांना आनंदाची बातमी

Sharad Pawar & Rajnath Singh

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले असताना सर्व विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेत पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. या भेटीत पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी  पत्रकारांशी बोलताना आपण शेतकरी आंदोलनावर भाष्य करणार नाही, असेही स्पष्ट केले होते. कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.

आज पवार यांनी पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली. ‘पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवे  विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिला. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्याचे पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून सांगितले. त्यामुळे, पुरंदर येथील विमानतळासाठी जमीन  अधिग्रहण कामाला लवकरच सुरुवात होईल, असे दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER