शरद पवार अडकले भाजपच्या ट्रॅकमध्ये: प्रकाश आंबेडकर

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकले असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेता प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार हे राष्ट्रीय नेते नसून ते आता केवळ बारामतीचे नेते राहिले आहेत. सोलापूरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हे आता लयास आले असून काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच आता विरोधक झालो असल्याचे सांगताना आंबेडकर म्हणाले, विधानसभेची तयारी करत असून विधानसभेला मुख्य राजकीय पक्ष असणार असल्याचे सांगतानाच त्यांनी पुन्हा एकदा वेगळी चूल मांडण्याचे स्पष्ट संकेतही दिले.

ही बातमी पण वाचा : शरद पवार राष्ट्रीय नाहीत, फक्त बारामतीचे नेते – प्रकाश आंबेडकर

माझ्यावर सुपारी घेतल्याचा ज्यांनी आरोप केला ते काही सिद्ध करू शकले नाहीत. तेच खरे आरोपी असून आम्हाला लोकांनी स्विकारले असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला. सत्तेच्या नादात काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वत:चे विघटन केले आहे. पुन्हा संघटन उभे करायचे असेल तर दोघांनी वेगवेगळे लढले पाहिजे, असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे.