शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद ; राष्ट्रवादीच्या नेत्याची माहिती

Maharashtra Today

मुंबई :-  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Mumbai Breach Candy Hospital) पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) रुग्णालयात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी दिली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून पवार रुग्णालयात दाखल आहेत.

डॉ. अमित मायदेव यांनी काल (गुरुवार) संध्याकाळी सात वाजता शरद पवार यांची तपासणी केली. आता त्यांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय त्यांची तब्येतही चांगली असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन सांगितले.
लिंक;

 

ही बातमी पण वाचा : पवारांचं काम मोठं, यासाठीच मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण दिलं- संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button