शरद पवारांकडून नेहमीच जातीयवाद केला जातो : चंद्रकांत पाटील

chandrkat dada-pawar

मुंबई : पवारांकडून नेहमीच जातीयवाद केला जातो. पवार प्रचंड जातीयवादी आहेत, असा आरोप करीत चंद्रकांत दादा म्हणाले, संभाजीराजेंनी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी संभाजीराजे पेशव्यांसोबत गेले, असे पवार यांनी म्हटल्याचे सांगत पवार हे जातीयवादी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकात पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांच्या प्रचारदौऱ्याचे, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पण, पवार हे प्रचंड जातीयवादी असल्याची टीकाही पाटील यांनी केली. तसेच, पवारांनी हातवारे केले हे अतिच होत आहे. यापूर्वीही त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली होती. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना हे शोभत नाही, असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना चंपा या विधानाविषयी विचारले असते, ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग आहे. अजित पवारांना, मी याबाबत काहीही बोलणार नाही. पण, राज ठाकरेंनी नवीन नाव शोधायला पाहिजे होते,

राज ठाकरे हे अतिशय हुशार आणि क्रिएटीव्ह व्यक्ती आहेत. राज यांचे नेतृत्वही महाराष्ट्रात चांगले आहे. मी त्यांना कॉलेजपासून ओळखतो, ते माझे चांगले मित्र आहेत. ते मला मित्र समजतात की नाही, हे मला माहित नाही, ते खूप मोठे नेते आहेत, असेही पाटील यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : प्रचार फेरीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी टाळली वाहतूक कोंडी!