शरद पवारांना नातू पार्थ आणि सुनेकडून घ्यावे लागले कर्ज

Sharad Pawar-Partha Pawar

मुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वांत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांना ओळखले जातात. राजकारणात शरद पवारांएवढा कुणालाच अनुभव नाही असं सांगितलं जातं. गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि संजय राऊत (Sanjay raut) या नेत्यांमुळे महाराष्ट्रातील सत्ता भाजपला गमवावी लागली.

अशातच सध्या चर्चा आहे ती शरद पवारांकडे असलेल्या एकूण संपत्तीची. आणि ही चर्चा सुरू झाली ती म्हणजे पवार यांना नुकतीच आयकर विभागाकडून मिळालेली एक नोटीस. या नोटिशीत शरद पवार यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यामधील काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

शरद पवार लवकरच या नोटिशीला उत्तर देणार आहेत. स्वतः शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. मात्र शरद पवार यांची संपत्ती असेल तरी किती याची माहिती सकाळ वृत्तपत्राने प्रकाशित केली आहे. सकाळने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार शरद पवारांची संपत्ती पुढीलप्रमाणे आहे.

जाणून घेऊयात शरद पवारांच्या संपत्तीबाबत :

स्थावर मालमत्ता :

१ कोटी ३० लाख ९७ हजार ९६० रुपयांच्या शेतजमिनी
९१ लाख ७१ हजार ४८० रुपयांची बिगरशेती जमीन आहे.
३ कोटी १२ लाख ५० हजार रुपये मालकीची व्यावसायिक इमारत
२ कोटी १७ लाख १४ हजार ५०१ रुपये मालकीची रहिवासी इमारत

जंगम मालमत्ता :
बँकेत विविध स्वरूपात ९ कोटी ३९ लाख ९३ हजार ३८६ रुपये त्याचबरोबर ६५ हजार ६८० रुपये रोकड

शेअर्स आणि बॉण्ड्सच्या स्वरूपात गुंतवलेली रक्कम :

७ कोटी ४६ लाख २४ हजार ४४९ रुपये
८८ लाख ६५ हजार ८०५ रुपयांचे दागिने

कर्ज स्वरूपात दिलेली रक्कम :
शरद पवारांनी ७ कोटी ४५ लाख ८४ हजार रुपये एवढे वैयक्तिक कर्ज दिलं

कर्ज म्हणून असलेली रक्कम :

शरद पवारांवर १ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातील ५० लाख रुपये शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आणि ५० लाख रुपये पार्थ पवार यांच्याकडून घेतले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या नावावर एकही गाडी नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER