फडणवीसांच्या ‘त्या’ शपथविधीचा सत्ताडाव शरद पवारांनी १९७८ ला खेळला होता

Fadnavis-Sharad Pawar

दोन दिवसांपूर्वी अमित शहा कोकण दौऱ्यावर होते. नारायण राणेंनी उभारलेल्या भव्य वैद्यकीय महाविद्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलं. याप्रसंगी बोलताना राणे म्हणाले, ” अमित शहांच्या (Amit Shah) पायगुणांमुळं हे महाविकास आघाडी सरकार जाईल.” याआधीही बोलताना फडणवीस म्हणाले होते, “आता फारकाळ विरोधी बाकावर बसावं लागणार नाही. राणेंच्या विधानावर उत्तर देताना राणे विनोद ही करतात हे माहिती नव्हतं असं शरद पवार म्हणाले. राज्यात ऑपरेशन लोटस झालं तर भाजप महाराष्ट्रात परत कधीच सत्तेत येणार नाही असं विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केलं

पक्ष फोडून सत्ता मिळवण्यावर पटोलेंनी ही विधान केलं असलं तरी ७०च्या दशकात खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) असा सत्ता डाव खेळला होता.

इंदिरांना आणीबाणीचा फटका बसला

वर्ष १९७७ आणीबाणी संपली. लोकसभेच्या निवडणूका झाल्या. कॉंग्रेसच्या हातातून पहिल्यांदा केंद्राची सत्ता निसटली. ही काही लहान मोठी हार नव्हती कॉंग्रेसचा सुफडा झाला. त्यामुळं कॉंग्रेसमध्ये राजीनामा पर्वाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातही कॉंग्रेसच सरकार होतं. पराभवाची जबाबदारी घेत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी राजीनामा दिला. वसंतदादा पाटील कॉंग्रेसचे नवे मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात कॉंग्रेसची दोन शकलं झाली होती. १. कॉंग्रेस (यू) २. कॉंग्रेस (आय). यशवंतराव चव्हाणांसोबत शरद पवार कॉंग्रेस (यू) मध्ये गेले. कॉंग्रेस (आय) म्हणेज इंदिरा कॉंग्रेस. आणीबाणीनंतर इंदिरांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत काहींनी कॉंग्रेस युनायटेड म्हणून कॉंग्रेसच (यु) ची स्थापना केली. १९७८ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांविरुद्ध लढल्या. त्यामुळं जनता दलाला फायदा झाला. १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता. याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला, तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी जनता पक्षाने ९९ जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या.

“त्यात शेतकरी कामगार पक्षाला १३, माकपला ९ आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळं राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती पण सरकार स्थापन करु शकली नाही. कारण कॉंग्रेसचे दोन्ही गट एक झाले होते. पुन्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

हे सरकार जास्त काळ चाललं नाही. ५ महिन्यांच्या आत हे सरकार कोसळलं. कारण शरद पवार पार्टीतून वेगळे झाले. ते एकटे बाहेर पडले नाहीत सोबत १२ आमदार घेवून बाहेर पडले. वयाच्या ३८व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपत घेतली ते ही जनता पार्टीच्या पाठिंब्यानं. त्यांच्या या चालीमुळं मोठमोठे राजकीय विश्लेष्क हैराण झाले. नंतर ४१ वर्षांनी अजित दादांनी काकांच्या पावलांवर पाऊल ठेवत पहाटे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत शपथ घेतली होती.

फार काळ खुर्ची टिकली नाही

दरम्यान आणीबाणीनंतर केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. इंदिरा गांधी पुन्हा सत्ते आल्या. पंतप्रधान बनल्या. जनता पक्षात उभी फुट पडली. एकूण परिस्थितीची प्रतिकुलता पाहून महाराष्ट्रातल्या खासदारांनी इंदिरा गांधींकडे महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. शरद पवार फक्त दोन वर्ष सरकार टिकवू शकले. १९८०ला पुन्हा निवडणूका झाल्या. इंदिरा कॉंग्रेसनं मोठ यश मिळवलं. पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचा पराभव झाला. आणि बॅरिस्टर अंतूलेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER