‘त्या’ दिवशी संसदेची पायरी चढता येणार नाही; शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला मोलाचा सल्ला

Sharad Pawar gives valuable advice to Supriya Sule

मुंबई :- दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं. या मुलाखतीदरम्यान आईबाबांकडून मिळालेल्या मोलाच्या सल्ल्याविषयी त्यांनी आठवणींना उजाळा दिला. मला वडील शरद पवार (Sharad Pawar) आणि आई हे खूप कमी सल्ले देतात; पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आवर्जून लक्षात ठेवते. मी जेव्हा बारामती मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहेस, ती पायरी चढण्याची संधी तुला लाभली हे तुझं भाग्य आहे.

बारामतीच्या (Baramati) लोकांमुळे ही संधी मिळाली आहे. जेव्हा तू बारामतीकरांना विसरशील त्या दिवशी ती पायरी चढता येणार नाही, असा सल्ला बाबांनी दिला होता, तो मी कायम लक्षात ठेवते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले .तसेच, ‘महाराष्ट्र (Maharashtra) आहे म्हणूनच दिल्लीचे राजकारण आहे. महाराष्ट्रातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही, हे वास्तव आहे, याची मला जाणीव आहे.’ असंही त्या म्हणाल्या. ‘महाविकास आघाडी सरकार टिकेल की नाही, अशी सुरुवातीला चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कामाची दखल घेतली जात आहे. भाजपचे नेते ऊठसूट टीका करत असतात; पण त्यांनी वैयक्तिक पातळीवर टीका करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाहीये, तर हा पक्षाच एक कुटुंब : सुप्रिया सुळे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button