मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची पक्षबांधणी सुरु; पवारांनी आव्हाडांवर सोपवली जबाबदारी

Jietndra Awhad - Sharad Pawar

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये संपुष्टात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पुन्हा नवी ऊर्जा निर्माण करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर दिली आहे. त्याकरिता मीरा रोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मीरा भाईंदर समन्वयक आनंद परांजपे, मीरा भाईंदर निरीक्षण संतोष धुवाळी आणि प्रमोद सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मीरा भाईंदर शहर एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पक्षाकडे चांगले कार्यकर्ते होते. पक्षाने चांगली संघटना बांधली होती. पण ज्यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी टाकली होती, त्यांनी पळून जाण्याची भूमिका घेतली. मीरा भाईंदरमध्ये पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी आता माझ्याकडे दिली गेली आहे. आपण पदाधिकारी-कार्यकर्ते मिळून एवढं चांगलं काम करु की इथे पक्ष पहिला जसा भक्कमपणे पाय रोवून उभा होता त्याचपद्धतीने आतादेखील पक्ष जोमाने उभा करु, असं आव्हाड म्हणाले.

जे कोणी गेले असतील त्यांना जाऊ द्या. जे राहिले त्यांच्यावर प्रामाणिकतेने विश्वास ठेवून आता आपल्याला पुढची लढाई लढायची आहे. तसंच यापुढच्या काळामध्ये मीरा भाईंदरमध्ये पक्षसंघटना बळकट करण्याचं काम पदाधिकारी-कार्यकर्त्यांना जोमाने करावे. आमच्या एका कार्यकर्त्याचं हॉटेल होतं. त्या हॉटेलला अनधिकृत म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी ३ वेळा जाऊन तोडलं. मी १२४ अनधिकृत हॉटल्सची यादी जाहीर करतो. जर आयुक्तांमध्ये हिम्मत असेल तर १२४ अनधिकृत हॉटेल्स पाडून दाखवावीत, असं आव्हान आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER