अहमद पटेल यांच्या शोकसभेला जाण्याचे संकट आलं, शोकसभेत पवार भावुक

Sharad Pawar - Ahmed Patel

मुंबई : मी सकाळपासून विचार करतोय काँग्रेसचे (Congress) दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या शोकसभेला जाण्याचे संकट आलेलं आहे. त्यांच्या शोकसभेत कशा पद्धतीने बोलावं. अहमद भाई बद्दल काय बोलावे विचार करत असताना मला आठवण आली, काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव गांधी यांच्या काळात अहमद यांनी अत्यंत थोडा काळ सत्तेत घालवला. पण त्यांचं मन सत्तेत रमले नाही. त्यांचं मन संघटना मोठी करण्यात होतं. त्यांच्यासारखं काम महाराष्ट्रमध्ये ज्यांनी केलं ते होते वसंतदादा पाटील (Vasantdada Patil), असं राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने रविवारी (14 डिसेंबक) अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं. या सभेला शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी पवार म्हणाले की, मी 1984 साली लोकसभेवर निवडून गेलो त्यावेळी राजीव गांधी यांच्या समवेत काम केलं. त्यावेळी अहमद भाई राजीवजी यांच्यासोबत होते. संयुक्त सरकारला चालविण्यासाठी ज्या समस्या निर्माण व्हायच्या त्या सोडविण्यासाठी अहमद भाई महत्वाचा दुवा होते. मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाचा काळ होता तेव्हा समस्यांचे निराकरण करण्याची जवाबदारी अहमद भाई शांतपणे पार पाडायचे, असं शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER