मराठा आरक्षणाबाबत पवारांनी दिले हे आश्वासन

Sharad Pawar - Maratha Reservation

सातारा :- मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आश्वासन दिले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी मी योग्य ते प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.

शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीसाठी गुरुवारी सातारा येथे आले होते. या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच काही संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींची भेट पवार यांनी घेतली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे ती उठवण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पवार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

शरद पवार म्हणाले की, मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी गेले अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यात वारंवार अडथळे येत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. आत शरद पवार यांनी नव्याने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र क्षीरसागर, बंडू कदम, ॲड. उमेश शेळके, संदीप पोळ आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : …त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली ; जुन्या सहकाऱ्याच्या निधनाने शरद पवार हळहळले ; कुटुंबीयांना दिला ‘हा’ शब्द

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER